मुंबई | नव्या विचारांची कास धरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आझाद मैदानावरील मोर्चाला परवानगी मिळणार की नाही याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी देण्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मोर्चासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याचा विचार करुन त्यांना परवानगी दिली जाईल, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
राज ठाकरेंना कोणत्या ठिकाणी परवानगी पाहिजे. यावर सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही निर्णय घेऊ. कायदा सुव्यवस्थेला कुठेही गालबोट लागायला नको, याचा सर्व विचार करुन त्यांना परवानगी देऊ, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी मनसेला मरिन ड्राईव्ह ते आझाद मैदान या मार्गावरुन मोर्चा नेण्यास परवानगी दिली आहे. मात्र मोर्चासाठी भायखळा ते आझाद मैदान या मार्गासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा एक नाटक होतं”
खरे सावरकर समजायला अनेक जन्म घ्यावे लागतील- विक्रम गोखले
महत्वाच्या बातम्या-
माझ्या भाषेमुळे अपमान झाला असेल तर क्षमा मागतो- आशिष शेलार
दिल्लीत प्रचाराला गेलेल्या चंद्रकांत पाटलांची केजरीवालांवर सडकून टीका
शेलारांनी शब्द जरा जपून वापरावेत; सुप्रिया सुळेंचा सल्ला
Comments are closed.