बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांनी ‘दूध का दूध पानी का पानी’ करावं- अनिल देशमुख

मुंबई | सध्या राज्यात सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचे प्रकरण गाजत आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंमार्फत पोलीस दलाला 100 कोटी कलेक्शनचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केलाय. यानंतर एकच खळबळ उडाली. या आरोपानंतर विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना 17 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप केलेत, त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नाही. त्यामुळे त्यांनी जे आरोप लावले आहेत, या संपूर्ण प्रकरणाची त्वरीत चौकशी करून दुध का दुध, पानी का पानी करावं, अशी मागणी अनिल देशमुखांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते…, असं अनिल देशमुख यांनी या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. या संदर्भात 21 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्रही या ट्वीटसोबत देशमुख यांनी जोडलं आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर त्यांची बाजू मांडली. माझ्याकडून कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. मी निर्दोष आहे. माझ्यावरील आरोप धादांत खोटे आहेत, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीबाबत पुणे महापालिकेेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

‘साडी नाही तर बरमुडा घाला’; ममता बॅनर्जींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली

काय सांगता! टिकटॉक स्टारपेक्षाही खरतनाक कावळ्याचा ‘कॅटवॉक’, पाहा व्हिडीओ

‘…म्हणून तर आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाली नाही ना?’; भाजप नेत्याचा सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More