धनुष्यबाणाचं बटन दाबलं, मत कमळाला गेलं; गोटेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार

धुळे |निवडणुकीपूर्वी मशिनचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. त्यावेळी अधिकाऱ्यांनी दहा वेळा धनुष्यबाणाचे बटण दाबले मात्र ही मतं कमळाच्या बटणाला गेली, असा खळबळजनक आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.

या साऱ्या प्रकाराविषयी आम्ही तेव्हाच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, मात्र निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नाही, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

काल धुळे महापालिकेची निवडणूक झाली. त्यावेळी हा प्रकार घडल्याचं अनिल गोटे यांनी सांगितलं.

दरम्यान, धुळ्यात भाजपला आव्हान देण्यासाठी गोटे यांनी लोकसंग्राम पक्षातर्फे उमेदवार दिले होते. मात्र गोटे यांच्या पक्षाचा काल सुपडासाफ झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या –

मोदींना आणखी एक धक्का; पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार डॉ. सुरजीत भल्लांचा राजीनामा

-भाजपची नौका बुडत असल्याचं दिसताच शेअर बाजाराला पुन्हा मोठे हादरे

-भाजपला सर्वात मोठा धक्का; 3 राज्यांमध्ये सत्ता जाण्याची शक्यता

-काँग्रेसचे ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता; 5 पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर

-पळवा-पळवीची भीती; काँग्रेसनं आपल्या विजयी उमेदवारांना दिले हे आदेश!