महाराष्ट्र मुंबई

“सामना ब्रँड आहे आणि ती ठाकरे शैली आहे, त्या ब्रँडला साजेशी भाषाच लिहिली जाते”

मुंबई | औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर ‘सामना’तून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली त्याबाबत मी ‘सामना’च्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. यावर शिवसेना नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘सामना’मधून गलिच्छ टीका झाली, असं म्हणणं योग्य नाही. ‘सामना’त ठाकरी शैलीचा वापर केला जातो. तोच ‘सामना’चा ब्रँड आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषा ‘सामना’त लिहिली जाते, असं अनिल परब यांनी सांगितलं.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस होती, त्यावेळी त्यांची भाषा शोभनीय नव्हती, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. संपादक म्हणून ही त्यांची भाषा असू शकत नाही, मग अग्रलेखात ती कशी? त्यामुळे त्यांना मी पत्र लिहिणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत आला त्या वेळेस पवार साहेबांनी शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला”

केरळ सरकारने कृषि कायद्यांविरोधात मंजूर केला ठराव; भाजप आमदारानेही दिला पाठिंबा

‘सामना’च्या अग्रलेखातील भाषेबाबत रश्मी वहिनींना पत्र लिहिणार- चंद्रकांत पाटील

“काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का, असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला?”

‘सरपंच पदाचा लिलाव म्हणजे…’; अण्णा हजारेंचं मोठं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या