मुंबई | कृपया आत्महत्या करू नका, तुमच्या आत्महत्येनंतर कुटुंबावर ओढावणारं संकट फार मोठं असेल. सध्याचं संकट तात्पुरतं आहे. यावर लवकरच मार्ग काढू, पण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलंय.
एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचा पगार देण्यात येणार असून, तासाभरात या महिन्याचा पगार जमा होणार असल्याचीही माहिती अनिल परबांनी दिली आहे.
दिवाळीपूर्वी अजून एक महिन्याचे वेतन असे एकूण थकीत दोन महिन्यांचे वेतन दिलं जाणार आहे. हे तात्पुरते संकट आहे, एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नका, ही नम्र विनंती, असं अनिल परब म्हणालेत.
दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्याबाबत अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे. आजच एका तासात एक पगार आणि सणाची अग्रिम रक्कम देण्यात येईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या-
‘एसटी कामगारांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष द्या’; फडणवीसांंचं उद्धव ठाकरेंना पत्र
“राज्यपालांचा फोन आलेला, अर्णब यांच्या नातेवाईकांना भेटू द्या सांगितलं, पण तसं भेटता येणार नाही”
डोनाल्ड ट्रम्प जिंकायला हवे होते, पण आता…- रामदास आठवले
“राज्यपालांनी अर्णब गोस्वामींऐवजी नाईक कुटुंबाची काळजी करावी”
“ठाकरे सरकारविरोधात 302 कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा”