मुबंई | सध्या शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत आहे. अद्यापही शिवसेनेची गळती सुरूच आहेत. काल परवापर्यंत शिवसेनेसोबत असणारे नेते शिंदे गटाला जाऊन मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांनी ठाकरे सरकारचे अनेक निर्णय रद्द अथवा स्थगित केले आहेत. यातच आता शिवसेनेच्या एका महत्वाच्या नेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अनिल परबांच्या चौकशीसाठी केंद्र सरकारकडून नेमण्यात आलेली समिती साई रिसाॅर्टवर दाखल झाली आहे. या टिममध्ये एकूण पाच सदस्य आहेत. पर्यावरण खात्याची पाच जणांची टीम मुरुडमधील रिसॉर्टवर दाखल झाली आहे.
या रिसाॅर्टमध्ये दाखल झालेल्या टिमकडून नेमकी काय कारवाई झाली याची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात पर्यावरणाची सुद्धा हानी झाली असून त्यांचीही चौकशी सुरू आहे. मुरूडमधल्या साई रिसाॅर्टने सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
साई रिसाॅर्टची पाहणी करून केंद्र आणि राज्याची टीम दापोली प्रांत कार्यालयात दाखल झाली आहे. या टीमने दापोली प्रांत अधिकारी यांच्याकडे कागदपत्रांबाबत चौकशी केली, अशी माहिती समोर आली आहे. दापोली प्रांत कार्यालयात महत्त्वाच्या माहितीसाठी बराच वेळ अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली.
थोडक्यात बातम्या
“महाराष्ट्राला 18 तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले”
मोठी बातमी! 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित
केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना झटका; ‘या’ वस्तू महागणार
असंसदीय शब्दांची यादी जाहीर; संसदेत जुमलाजीवी, हुकूमशाही शब्द वापरण्यास बंदी
मोठी बातमी! शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय; वाचा एका क्लिकवर
Comments are closed.