महाराष्ट्र रत्नागिरी

“भाजपची कित्येक ठिकाणी डिपॉझिट जप्त झालीय, त्यांनी आत्मपरीक्षण केलं तर आम्ही सुद्धा करु”

रत्नागिरी | बिहार निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या शिवसेनेवर काय बोलायचे? अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलंय.

अशी कित्येत ठिकाणी त्यांची डिपॉझिट जप्त झाली आहे. त्यांनी जर आत्मपरीक्षण केलं असेल तर आम्ही सुद्धा करु, असा टोला अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय.

शिवसेना बिहारमध्ये प्रमुख पक्ष म्हणून लढलेली नाही. एका जमान्यात भाजपचे सुद्धा फक्त दोनच खासदार होते. यश-अपयश, चढ-उतार होत असतात, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

ज्या पक्षाचे दोन खासदार होते त्या पक्षाचा आज पंतप्रधान बसलाय. त्यामुळे मतांवरुन मोजमाप होवू शकत नाही. एका जमान्यात महाराष्ट्रात बीजेपीची काय परिस्थिती होती हे माहित आहे ना?, अशी बोचरी टीका अनिल परब यांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या-

“शिवसेनेमुळे काँग्रेसला खूप काही ऐकावं लागतंय”

“नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देणं म्हणजे हरलेल्या पहिलवानास विजयाचं पदक देणं”

“तेजस्वीच्या रुपाने देशाला युवा नेता मिळाला, त्यांनी थोडी वाट पाहावी”- शिवसेना

‘तेजस्वी यादव चांगले व्यक्ती, ते बिहारचं नेतृत्व करू शकतात’; ‘या’ भाजप नेत्याकडून तेजस्वी यादव यांचं कौतुक

क्रिकेटमधील निवृत्तीनंतर धोनी वळला ‘या’ व्यवसायाकडे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या