Top News आरोग्य कोरोना

कोरोनाच्या लसीचा डोस घेतलेले हरियाणाचे मंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण!

हरियाणा | हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झालीये. मुख्य म्हणजे अनिल वीज हे कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत स्वयंसेवक बनले होते.

यासंदर्भात अनिल वीज यांनी ट्विट केलंय. ते म्हणाले, “मला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलंय. अंबाला इथल्या सिव्हील रुग्णालयात सध्या मी उपचार घेतोय. माझ्या संपर्कात आलेल्यांनी तातडीने कोरोनाची चाचणी करुन घ्यावी.”

20 नोव्हेंबर रोजी कोरोनावरील ‘कोवॅक्सीन’ या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली होती. त्यावेळी अनिल विज यांनी स्वत:हून पुढाकार घेत कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतला होता.

अनिल वीज यांच्यासोबत 200 जणांना या लसीचा डोस देण्यात आला होता. पुढील डोस 28 दिवसांनंतर देण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच अनिल वीज यांना कोरोनाची लागण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालांनंतर फडणवीसांचं सत्तास्थापनेबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले…

दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून रवींद्र जडेजा बाहेर; ‘या’ मराठमोळ्या खेळाडूचा टीममध्ये समावेश

“शरद पवारांच्या वक्तव्याकडे वडिलकीचा सल्ला म्हणून पाहा”

1 मे 2021 पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होणार- उद्धव ठाकरे

चंद्रकांतदादा आणि देवेंद्र फडणवीस म्हणत असतील ‘काश आज ईव्हीएम होता’- हसन मुश्रीफ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या