पुणे | भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात विशेष न्यायालयाने साक्षीदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
अंजली दमानिया यांचे वकील असीम सरोदे यांनी विशेष न्यायालयात ही मागणी केली. भोसरी भूखंड प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या एकसदस्यीय कमिटीचे अध्यक्ष न्यायाधीश डी. एस .झोटिंग यांचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहकार्य घ्यावे, अशी सूचनाही दमानिया यांनी मांडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात सक्तवसुली संचलनालयाकडून एकनाथ खडसे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. यानंतर त्यांची चौकशीही झाली आहे.
ईडीने भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात अंजली दमानिया यांचे वकील असीम सरोदे यांची मदत घेतली होती, ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रांची माहिती असीम सरोदे यांच्या कार्यालयातून घेतली होती.
थोडक्यात बातम्या-
पुण्यातील त्या पीएचडीच्या विद्यार्थ्याच्या हत्येमागचं गूढ उकललं; पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर
काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी!
आयआयटी प्रोफेसर असल्याची बतावणी करून व्यापाऱ्यांना घातला ‘इतक्या’ लाखांना गंडा
“मोदींना आणि योगींना मुलं नाहीत ते काय कुणाला देऊन जातील”
मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या मंत्र्याच्या मुलाला झाली कोरोनाची लागण
Comments are closed.