मनोरंजन

‘…म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नाही’; अंकिता लोखंडेने सोडलं मौन

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिने मौन सोडत अनेक खुलासे केलेत. सुशांतच्या अंत्यविधीला अंकिता हजर नव्हती. यावरून तिला सोशल मिडीयावर ट्रोलही करण्यात आलं. मात्र एका मुलाखतीदरम्यान अंकिताने अंत्यविधीला उपस्थित न राहण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.

अंकिताच्या सांगण्यानुसार, “मी सुशांतला कधीच त्या अवस्थेत पाहू शकले नसते. मी त्याला त्या अवस्थेत पाहिले असतं तर मी ते चित्र कधीच विसरू शकले नसते. त्यामुळे मी त्याच्या अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय घेतला होता.

अंकिता पुढे म्हणते, “सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकताच मला धक्का बसला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. सुशांत असं काही करेल, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्याच्या अंत्यविधीला मी जाऊच शकणार नव्हते. सुशांतला त्या अवस्थेत बघणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. म्हणून मी अंत्यविधीला जाणं टाळलं.”

सुशांत डिप्रेशनमध्ये जाणं शक्यच नाही. मी त्याला ओळखत होती. नैराश्य आणि काम मिळत नसल्यामुळे आत्महत्या करायची असती तर त्याने तेव्हाच केली असती, असंही अंकिता या मुलाखतीत म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या-

अभिनेता आफताब शिवदासानी झाला ‘बाप’माणूस!

मी कृषीमंत्री होतो त्यावेळी शेतकऱ्यांवर…, एकनाथ खडसेंचा ठाकरे सरकारवर प्रहार!

अक्षय कुमारने नाशिकपाठोपाठ मुंबई पोलिसांनाही केली मदत

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा सुशांतसिंग प्रकरणावरून उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या