Top News

शेतकरी पाकिस्तानी नाहीत, केंद्रानं त्यांचं ऐकावं- अण्णा हजारे

अहमदनगर|  शेतकरी अहिंसेच्या मार्गांनं आंदोलन करत आहेत. परंतु जेव्हा त्यांच्या हातून काही हिंसाचार घडला तक त्याची जबाबदारी कोण घेणार. शेतकरी पाकिस्तानी नाहीत. सरकारनं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं आहे.

शेतकरी आणि सरकारची स्थिती भारत पाकिस्तानप्रमाणे झाली आहे. जसं निवडणुकांच्या वेळी नेते शेतकऱ्यांच्या घरांमध्ये शेतांमध्ये मतं मागायला जाता, तशाचप्रकारे त्यांच्या समस्यांवरही चर्चा करा, असं अण्णा हजारे म्हणाले.

शेतकरी इतक्या दिवसांपासून आंदोलन करत आहेत हे देशाचं दुर्देव आहे. जे शेतकरी आंदोलन करत आहेत ते पाकिस्तानी नाहीत. आपल्याच देशातील आहेत. निवडणुकांच्या दरम्यान जसं तुम्ही मतं मागण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत शेतापर्यंत जाता तसं आता त्यांच्या समस्याही सोडवा, असं अण्णा हजारे यांनी म्हटंय.

महत्वाच्या बातम्या-

“खासदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाहेरून आलेलं म्हणणं ही शोकांतिका”

दुसऱ्या वनडे सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून भारताचा धुव्वा; टीम इंडियाने मालिकाही गमावली

“हे सरकार आहे की तमाशा? कोण काय करतं ते दुसऱ्याला माहीत नसतं”

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील हीच काय ती भारताची एकमेव अचिव्हमेंट!

कार्यकर्त्यांमध्ये जात नसते, ज्याला तिकीट पाहिजे असतं त्यांना जात आठवते- नितीन गडकरी

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या