अहमदनगर | सरपंच निवडीवरून चांगलच राजकारण तापलं आहे. फडणवीसांच्या काळातीस जनतेतून सपरंच निवडण्याचा पद्धतीला महाविकास आघाडीने बदलून पुन्हा ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
फक्त गावचे सरपंचच नाही तर राज्याचे मुख्यमंत्रीही थेट जनतेतून निवडून दिले पाहिजेत. तेच सत्तेचं खरं विकेंद्रीकरण ठरेल, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र सरकार ग्रामपंचायत सदस्यांच्या मार्फत सरपंच निवडीचा विचार करीत आहे. पण असं केल्यानं लोकशाहीला धोका निर्माण होऊन हुकूमशाही येण्याची शक्यता आहे. निवडून दिलेल्या सदस्यांनीच सरपंच निवडावा, असंही अण्णांनी सांगितलं आहे.
एकीकडे राज्यपालांनी महाविकास आघाडीनं काढलेला अध्यादेश काढण्यास नकार दिल्यानं सध्या नव्या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी बारगळली आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच निवडीची कोणती पद्धत योग्य?, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
ट्रेंडिंग बातम्या
…म्हणून डोनाल्ड ट्रम्प दारु आणि सिगारेटला हात लावत नाहीत!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कर्जमाफीचा दुसरा टप्पाही लवकरच जाहीर करतील- बच्चू कडू
महत्वाच्या बातम्या-
इंदोरीकर महाराज नगर जिल्ह्याचं भूषण आहेत- सुजय विखे
मोदींच्या नेतृत्वात भारत गरीबीतून बाहेर पडतोय- डोनाल्ड ट्रम्प
एक चहावाला देशाचा पंतप्रधान होणं हे कौतुकास्पद- डोनाल्ड ट्रम्प
Comments are closed.