अहमदनगर | 8 किंवा 9 तारखेपर्यंत लोकपाल नियुक्तीबाबत निर्णय घेतला नाही तर पद्मभूषण पुरस्कार परत करणार, असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला दिला आहे.
लोकपाल, लोकायुक्त, शेतीमालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी अण्णा गेल्या 5 दिवसांपासून राळेगण सिद्धी येथे उपोषणाला बसले आहेत.
आज गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेतली. मात्र या भेटीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.
कायदा होऊनही सरकार लोकपाल नेमायला तयार नाही, त्यामुळे जोपर्यंत सरकार लोकपाल नेमत नाही तोपर्यंत उपोषण करत राहणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सूरज चव्हाण, रविकांत वर्पे आणि मेहबुब शेख युवक राष्ट्रवादी प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत
–मुख्यमंत्र्यांनाही अण्णांच्या तब्येतीची काळजी- गिरीश महाजन
-“निवडणुकीसाठी एकत्र येऊ की नाही, हे आताच सांगता येणार नाही”
–नागपुरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध श्रीहरी अणे लढत?
-“नवाब मलिकांनी माफी मागावी, अन्यथा खटला दाखल करणार”
Comments are closed.