बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता कुणीही पत्राला उत्तर दिलं नाही”

अहमदनगर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मी येत्या विधानसभेत मसुदा ठेवून कायदा करावा यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे एक पत्र सोडता कोणाचेही पत्र आले नाही, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात लोकायुक्त कायदा करावा यासाठी अण्णा हजारे प्रयत्नशील आहेत. यासंबंधी त्यांनी वेळोवेळी सरकारशी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, पूर्वीच्या सरकारने आश्वासन दिलेला लोकायुक्त कायदा अद्याप झालेला नाही. अण्णा यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांशी यासंबंधी पत्रव्यवहार केला आहे.

लोकायुक्त कायदा करण्यासाठी आपण वेळोवेळी महाराष्ट्र सरकारकडे पत्रव्यवहार केला. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारला तब्बल नऊ पत्रं लिहिली. मात्र, फडणवीस सरकार महाराष्ट्र राज्यात लोकायुक्त कायदा करीत नाही, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

माहितीच्या अधिकाराप्रमाणे सशक्त लोकायुक्त कायदा मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळं तो लवकरात लवकर करावा, अशी मागणी अण्णा हजारे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबईच्या महापौरांनी भाजपचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा फेटाळला!

महत्वाच्या बातम्या-

पोलिसांनी शिवाजी महाराज आणि जिवा महालाचा आदर्श घ्यावा- अजित डोवाल

ठाकरे सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प

…नाहीतर जनता तुम्हाला मिटवून टाकेल; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More