बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘… अन्यथा जेलभरो आंदोलन करू’; अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला अल्टीमेटम

अहमदनगर | महाराष्ट्रासह पुर्ण देशभरात अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव साजरे केले जातात. मात्र कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्व सण आणि उत्सवांवर सरकारने निर्बँध लावले आहेत. आता कोरोना रूग्णसंख्या कमी होत असताना राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी करण्यात येत आहे. राज्यातील मंदिरं उघडण्यात यावी, अशी भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला अल्टीमेटम दिला आहे.

मंदिरं बंद ठेवणे हे राज्य सरकारचे धोरण बरोबर नाही. 10 दिवसात जर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही तर मोठे जेल भोरो आंदोलन करा, मी तुमच्या बरोबर राहील, असा इशारा अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. मंदिर बचाव कृती समितीने अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तिथं होणाऱ्या गर्दीतून कोरोना वाढत नाहीये का?, असा सवाल अण्णा हजारे यांनी विचारला आहे. समाज परिवर्तनाचा मार्ग तुम्ही बंद ठेवला. मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले?, असं म्हणत अण्णा हजारे यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, दारुचे ठेके आणि बार उघडताना कोरोनाची तिसरी लाट आडवी येत नाही. त्याचबरोबर मॉल उघडताना, बाकीच्या गोष्टी उघडताना बंद करताना तिसरी लाट आडवी येत नाही. पण मंदिरं उघडी करताना कोरोना आडवा येतो, अशी टीका भाजपने केली होती. त्यानंतर आता अण्णा हजारे आक्रमक झालेले दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

“अनिल परब यांना ठाकरे सरकारने स्वतःहून अटक केली नाही तर…”

काबूल विमानतळाबाहेर चकमक; अमेरिकन सैन्याकडून चोख प्रत्युत्तर

मुख्यमंत्र्यांचा विरोध केला म्हणून पोलिसांचा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

आता स्वस्त किंमतीत सोन्यात गुंतवणूक करा; केंद्र सरकारची मोठी योजना

तिसऱ्या कसोटीत भारताचा दारूण पराभव; इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज ढेर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More