बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाढदिवसाच्या नावाखाली केकची नासाडी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, पाहा व्हिडीओ

मुंबई | वाढदिवसाचं नाव काढताच पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे केक. फक्त वाढदिवसच नाही तर कुठलंही सेलिब्रेशन करायचं म्हटलं की केक कापणं ही एक जणू परंपराच झाली आहे. मात्र कोरोना काळात या परंपरेला कुठेतरी आळा बसण्याचं काम झालं आहे. लाॅकडाऊन पडल्यामुळे अनेकांनी घरीच साधेपणानं वाढदिवस साजरा केल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता हळूहळू निर्बंथ शिथिल होत असल्यानं सगळं पूर्वपदावर येत आहे. यातच आता वाढदिवसाच्या एका व्हायरल व्हिडीओनं सगळीकडे संतापाची लाट उसळली आहे.

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ मुंबईतील वाढदिवसाच्या सोलिब्रेशनचा आहे. हा वाढदिवस साजरा करत असताना तरुणांनी कोरोना नियमांचा फज्जा तर उडवलाच उडवला त्याशिवाय केकचीही नासाडी केल्याचं पाहायला मिळतंय. या तरुणांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओवर संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ मुंबईतील लाल बहादूर शास्त्री मार्ग परिसरातील असून 15 ते 20 युवक व्हिडीओमध्ये दिसत आहेत. एकत्र ठेवलेले 33 केक बर्थडे बाॅयनं कापल्यानंतर सगळेच तरुण केकवर तुटून पडले आणि केक एकमेकांच्या तोंडाला चोळू लागले. केकची तर त्यांनी होळीच खेळलेली पाहायला मिळाली. त्यांनी केलेल्या या अन्नाच्या नासधूसमुळे सोशल मीडियावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

दरम्यान, कोरोना काळात हे जंगी सेलिब्रेशन आता या तरूणांना चांगलंच भोवणार आहे. त्यात त्यांनी कोरोनाच्या नियमांचे बारा वाजवले आहेत. ना मास्क घातलं आहे, नाही सोशल डिस्टन्सिंग पाळलं आहे. या व्हिडीओची दखल मुंबई पोलिसांनी घेतली असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

थोडक्यात बातम्या –

’15 दिवस धोक्याचे’; केंद्राकडून राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना

41 वर्षांनंतर हाॅकी संघानं रचला इतिहास; रोमांचक सामन्यात भारताचा दणदणीत विजय

मी चुकीचा होतो तर, केंद्रावर ही वेळ का आली?- अशोक चव्हाण

“चित्रा वाघ यांना शिवसेनेत यायचं होतं पण शिवसेनेनं प्रवेश नाकारला, त्यामुळे त्या…”

‘या’ विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नाकात 1000 पटीनं अधिक व्हायरस, संशोधनातून नवी माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More