बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ड्रग्ज प्रकरणात बाॅलिवूडमधून आणखी एक मोठं नाव आलं समोर!

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरण समोर आलं. एनसीबीनं अनेक मोठमोठ्या लोकांच्या घरी, ऑफिसवर छापे टाकले. अशातच आता पुन्हा एकदा एनसीबीनं मुंबई क्रुझवर छापा टाकला. त्यानंतर हे प्रकरण आणखीनच चिघळताना दिसत आहे. आता याप्रकरणात आणखी एका व्यक्तीचं नाव समोर येत आहे.

एनसीबीचं सध्या धाड टाकण्याचं सत्रच सुरु असल्याचं दिसत आहे. एनसीबीनं आता बाॅलिवूड चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले आहेत. एनसीबीकडून इम्तियाज खत्री यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बाॅलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे.

रेव्ह पार्टी प्रकरणात अडलेल्या अचित कुमारच्या चौकशीत इम्तियाज खत्रीचे नाव पुढे आलं. गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात इम्तियाज खत्रीचे नाव देखील समोर आले होते परंतु त्यानंतर त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आता पुन्हा एकदा त्याचं नावं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आर्यन खानसोबत आणखी 7 जणांना क्रूझवरील रेव्ह पार्टीत अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी हळूहळू लोकांची नावं समोर येत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

पिंपरी चिंचवडमध्ये भीषण अपघात, भरधाव कारने चिमुकल्याला चिरडलं

मुंबईकर महिलांसाठी आज विशेष लसीकरण, नोंदणी न करता मिळणार दोन्ही डोस

पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करणं सरकारच्याच हातात- शक्तिकांत दास

लसीचा एकही डोस न घेतलेल्या कर्माचाऱ्यांना झटका; सरकारने घेतला मोठा निर्णय

“मी सांगितलं होतं निवडून येऊ देणार नाही, मग पाडलं काय म्हणता”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More