महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन, पेट्रोलपंप, हॉटेलसाठी नवीन नियमावली
मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वाढत असून त्याला रोखण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र कोरोना मोठ्या प्रमाणात फोफावत चालला असल्याचं पाहून औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
31 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लागू असणार आहे. त्यामुळे 30 मार्च रोजी सर्व व्यवहार रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू असणार होता. मात्र आता आदेशात प्रशासनाने सुधारणा केली असून नवीन आदेशानुसार 31 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांना सकाळी 8 ते 12 वाजेदरम्यान इंधन उपलब्ध असणार आहे तर 12 वाजल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांना त्याचं ओळखपत्र दाखवून इंधन मिळणार आहे. तर शहरात होम आयसोलेशनची संख्या मोठी असल्याने हॉटेल्सला रात्री आठ वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करण्याची सूट देण्यात आली आहे.
दरम्यान, ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगानं वाढतं आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावताना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणं सांगून लॉकडाऊन लावा, अशा सूचना मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.
थोडक्यात बातम्या-
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूीवर पुण्याच्या महापौरांनी घेतला हा महत्त्वाचा निर्णय
पुण्यासाठी आजचा दिवस जरा बरा, एवढ्या कोरोना रुग्णांची नोंद
भारत नानांवर प्रेम करणारी जनता भगीरथ भालके यांना विजयी करणारच- सुप्रिया सुळे
शेकाप आमदार जयंत पाटील यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण
मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यानंतर शेख हसीनांची ‘ती’ साडी चर्चेत; जाणून घ्या कारण
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.