बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय संघाला मोठा धक्का; विराटनंतर आता आणखी एकाचा राजीनामा

मुंबई | भारतीय क्रिकेटमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. काही दिवासांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला बीसीसीआयनं डच्चू दिला होता. त्यांनतर भारतीय क्रिकेटमधील वाद उफाळून आला होता. अशातच आता आणखी एक धक्का भारतीय संघाला बसला आहे.

विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये वादाला चांगली सुरूवात झाली आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराटच्या बोलण्यात बराच फरक स्पष्ट जाणवत आहे. अशात बीसीसीआयचे चीफ मेडिकल ऑफिसर अभितीत साळवी यांनी आपला राजीनामा बीसीसीआयला सोपवला आहे.

गेली 10 वर्ष अभिजीत साळवी हे भारतीय क्रिकेटशी जोडलेले होते. अनेक दौऱ्यांवर त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. कोरोनाच्या कठीण काळात भारतीय संघातील वातावरण चांगलं ठेवण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता यावा यासाठी आपण राजीनामा दिला असल्याची माहिती साळवी यांनी दिली आहे.

दरम्यान, साळवी यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयला नवीन मेडिकल ऑफिसरची गरज भासणार आहे. तोपर्यंत बीसीसीआयनं चाल्स मिंज यांना मेडिकल ऑफिसर म्हणून आफ्रिका दौऱ्यावर पाठवलं आहे.

थोडक्यात बातम्या 

पंतप्रधान मोदींनी सहकाराला जगवण्याचं काम केलं- देवेंद्र फडणवीस

“रामदास कदमांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झालीये”

“दोन एकर विकून पोराला शिकवलं पण पोराचा संयम ढासळला”

कुत्रे अन् माकडांमध्ये युद्ध पेटलं; पिल्लाला मारल्यानंतर ‘बदला’ घेण्यासाठी माकडांनी 250 कुत्र्यांना संपवलं

सहकार चळवळ मागे का पडली?, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले?- अमित शहा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More