बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोलकाता पाॅर्न रॅकेट प्रकरणात आणखी एका फोटोग्राफरला अश्लील व्हिडीओ बनवण्याच्या आरोपात अटक

नवी दिल्ली | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पाॅर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर कोलकातामधील नॅन्सी भाभी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नंदीता दत्त आणि फोटोग्राफर मौनक घोष यांना देखील अश्लील व्हिडीओ चित्रीकरण करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात आणखी एका फोटोग्राफरचं नाव समोर आलं आहे.

नंदीता आणि मौनक यांच्या चौकशी दरम्यान फोटोग्राफर शुभंकर दे हा देखील अश्लील व्हिडीओ चित्रीकरण करण्यात सहभागी असल्याचं समोर आलं आहे. शुभंकर हा मुळचा हुगळी येथील असून त्याला पोलिसांनी हुगळी येथूनच ताब्यात घेतलं आहे. आज रविवारी शुभंकर याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आरोपी मौनक घोष यांच्या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलिसांनी बल्लीगंजा येथील स्टुडीओमध्ये छापा टाकला. यावेळी तेथील सर्व कॅमेरे आणि उपकरणे ताब्यात घेण्यात आले आहेत. याच ठिकाणी चित्रीकरण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपी शुभंकर नव्या माॅडेल्सना धमकी देऊन त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवत होता.

एका माॅडेलने केलेल्या तक्रारीनुसार शुभंकर याने त्या माॅडेलचा अश्लील व्हिडीओ बल्लीगंजा येथिल स्टुडीओमध्येच शुट केला होता. आता या प्रकरणाबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच अजून कोणते स्टुडीओ आहेत का?, यांचे नेटवर्क कुठपर्यंत पोहोचले आहेत? याचा देखील पोलीस तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

भर मंडपात नवरा सोडून भलत्यानेच केलं नवरीला केलं किस अन्…

“आम्हाला कोणी थप्पड मारण्याची भाषा करु नये, अशी थप्पड मारू की…”

“पुरुषांच्या चुकीसाठी महिलांना दोष देणं कधी थांबवणार?”

“गोपीनाथ मुंडे आणि महाजनांच्या काळातील भाजप आता उरलेला नाही”

राजकीय गांजाडयांना शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्या शिवाय राहणार नाही- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More