राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; आता ही महिला नेता करणार भाजपत प्रवेश?

मुंबई | राष्ट्रवादीच्या डाॅ. भारती पवार आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे. दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादीने धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर केल्याने भारती पवार नाराज असल्याचं समजत आहे.

भारती पवार यांनी मागील लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिंडोरी मतदारसंघातून लढवली होती. यावेळी दिंडोरीची उमेदवारी न मिळाल्याने भारती पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजत आहे.

माढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार रणजितसिंह मोहीते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आज (बुधवार) भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

दरम्यान, भाजपचे दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी भारती पवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीला धक्का, अखेर रणजितसिंह मोहिते पाटलांनी केला भाजपमध्ये प्रवेश!

कालच्या बेधडक भाषणानंतर राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला!

मोहितेंच्या भाजप प्रवेशाने संजय शिंदेंचा राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा!

-आमदार मुरकुटेंच्या धमक्यांना मी भीक घालत नाही- शंकरराव गडाख

-नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे- राज ठाकरे