बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्पर्धा परीक्षेचा आणखी एक बळी! अपयशानं विद्यार्थ्यानं उचललं धक्कादायक पाऊल

औरंगाबाद | एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात स्वप्नील लोणकर या तरुणानं आत्महत्या केल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. अशातच आणखी एका एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचं समोर येत आहे.

किशोर भटू जाधव असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. मुळचा वाघाडी खुर्दचा असणारा किशोर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी औरंगाबादमध्ये राहत होता. नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेच्या निकालात किशोरला अपयश आलं. अपयश मिळाल्यानं तो पुर्णपणे तणावात गेला होता. याविषयी त्यानं आपल्या आईशीही बोलून नाराजी व्यक्त केली. याच तणावातून गुरूवारी सकाळी किशोरनं राहत्या खोलीबाहेर आयुष्य संपवलं.

परीक्षेच्या अपयशामुळे किशोर खूप नैराश्यात होता. गळफास लावून घेण्यापूर्वी किशोरनं एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात त्यानं काही मित्र-मैत्रीणींच्या नावाचा उल्लेख केला आहे. मित्र-मैत्रीणींसोबत असलेल्या आर्थिक व्यवहारामुळे आणि मानसिक त्रासामुळे मी आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, किशोरचे वडील हे वाघाडी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून त्याचा मोठा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात मिळालेली नोकरी नाकारून किशोर क्लास-वन ऑफीसर होण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र अखेर त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

थोडक्यात बातम्या – 

“कार्यकर्त्याचा अपमान मला मान्य नाही, काहीही अडचण आली तर फोन करा”

लहान मुलांसाठी महत्त्वाची बातमी ! पुण्यात ‘या’ लसीची ट्रायल सुरू

बाबो! बिस्कीट खाल्लं नाही तर मुलांच्या जीवाला धोका; ‘या’ शहरात पसरली अफवा अन्…

“चंद्रकांत पाटलांनी 15 डिसेंबरची मुदत दिली होती, म्हणजे 6 महिने…”

प्रा. दत्तात्रय चव्हाण यांना अर्थशास्त्र विषयात Ph.D.पदवी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More