raj and tanushree - भांडण तनुश्री-नानाचं; मनसेनं थेट 'बिग बॉस'ला पाठवली नोटीस
- मनोरंजन

भांडण तनुश्री-नानाचं; मनसेनं थेट ‘बिग बॉस’ला पाठवली नोटीस

मुंबई | तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकरांचा वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. मनसेचं नाव यात आल्यामुळे मनसेनं याप्रकरणी आता बिग बॉसला नोटीस बजावली आहे. 

मनसेच्या विद्यार्थी सेनेने बिग बॉस मेकर्स विरोधात कायदेशीर नोटीस पाठवली आहे. बिग बॉसमध्ये तनुश्री दत्ताला घेतलं तर या शो विरोधात मनसे निदर्शन करेल, असं या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे.

बिग बॉसमध्ये वादात अडकलेल्या सेलेब्रेटींना जागा दिली जाते.  काही दिवसांपुर्वी तनुश्री दत्ता आणि तिची बहीण इशिता दत्ता बिग बॉसमध्ये येणार असल्याच्या चर्चा होत्या. 

दरम्यान, तनुश्रीने नाना पाटेकरांवर अश्लील वागल्याचा आरोप केला आहे. तसंच त्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मला धमकावलं देखील होतं, असे आरोप तनुश्रीने केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-निवड होताच पृथ्वी शॉच्या नावावर ‘हा’ अनोखा विक्रम

-नितीश कुमार भाजपची साथ सोडणार; काँग्रेसचा खळबळजनक दावा

-राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या तब्येतीची शिवसेना-भाजपला जास्त काळजी!

-तनुश्रीची बदनामी करणाऱ्यांना लाज वाटली पाहीजे!

-बाळासाहेब ठाकरेंना वाकडं बोलणाऱ्या लंगड्या भास्करचे पाय राऊतांनी चाटले!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा