मुंबई | गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीने जगभरात हाहाकार माजवला होता. लोकांना एकत्र येण्यास सरकारकडून निर्बंध लादण्यात येत होते. दोन वर्षानंतर कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झालेलं आहे. मात्र, राज्य सरकारने गुढीपाडवा आणि एप्रिल महिन्यातील काही सणांवर निर्बंध घालण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यावरून भाजप आमदार राम कदम यांनी राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.
हिंदू सणांवर निर्बंध घालू नयेत यासाठी राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. आपल्या सरकारने पुन्हा एकदा हिंदूंचा अत्यंत महत्वाचा सण गुढीपाडवा आणि राम नवमी यावर निर्बंध घालण्याचा मानस जाहीर केला आहे. असे जाचक निर्बंध आपलं सरकार हिंदू सणांवर का घालत आहे?,असा खोचक सवाल राम कदम यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये अशा कोणत्या शक्ती आहेत?, ज्या हिंदू विरोधी काम करत आहेत. त्यांना हिंदूंचे सण पाहवत नाहीत. हिंदू सण आले की, त्यांना निर्बंध आठवतात. असे हिंदू विरोधी महाराष्ट्र भूमीत ठेवून काढावे लागतील, असा घणाघात राम कदम यांनी केला आहे. आपल्या सरकारला गुढीपाडवा आणि रामनवमीला निर्बंध घालता येणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, जर चुकून निर्बंध घातले गेले तर महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला म्हणावे लागेल की, तुमचे निर्बंध गेले चुलीत. होळीच्या वेळेस सुद्धा सरकारने शिमगा साजरा करायचा नाही म्हणत निर्बंध घातले होते. आम्ही आमचा गुढीपाडवा आणि राम नवमी किंवा येणारे सर्वं सण ढोल ताश्यासहित साजरे करणारचं, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
नवाब मलिकांचं टेन्शन वाढलं! आता ईडीचं पथक नाशकात धडकलं, चौकशी सुरू
महागाईवर प्रश्न विचारताच बाबा रामदेव भडकले, व्हिडीओ व्हायरल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर नाराजी, शरद पवारांकडे केली तक्रार?
आर्थिक कोंडी फोडण्यासाठी रशियाने भारताला दिली ‘ही’ खास ऑफर
“…पण आम्ही देश वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू”
Comments are closed.