बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांचं आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचं वाटतं- अनुपम खेर

मुंबई | केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केलं आहे. या आंदोलनाला देशातील अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. अशातच बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारने शेतकऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्या ऐकल्या पाहिजेत. मात्र कधी कधी हे शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचं वाटत असल्याचं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.

आंदोलनामध्ये सरकारच्या निषेधार्थ दाखवण्यात आलेले खलिस्तानी झेंडे ही एक चिंतेची गोष्ट आहे. हे आंदोलन काही लोक हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलन हायजॅक होत असल्याचं पाहुण दुःख होत असल्याचंही खेर यांनी सांगितलं.

दरम्यान, शेतकरी त्यांचा अजेंडा ठेवूनच काम करत आहेत. मात्र काही लोकांमुळे आंदोलनाची दिशा बदलण्याची भिती वाटत आहे. जो कोणी अन्न खातो तो शेतकऱ्यांच्या या आंदोलनात शेतकऱ्यांना साथ देईल, असंही खेर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“नव्या संसदेसाठी, स्पेशल विमानासाठी पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही”

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांना पुरेशी मदत नाही, महाविकास आघाडीचं शेतकरी प्रेम नकली”

शेतकऱ्यांचा उद्या ‘हिंदुस्थान बंद’चा इशारा!

सिनेसृष्टीला धक्का! कोरोनामुळे ‘या’ अभिनेत्रीला गमवावा लागला आपला जीव

देशातील जनतेनंही स्वयंस्फुर्तीने शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’मध्ये सहभागी व्हावं- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More