गायीला वाचवण्याच्या नादात भाजपच्या अनुराग ठाकुरांच्या गाडीला अपघात

उना | रस्त्यावर आडव्या आलेल्या गायीला वाचवण्याच्या नादात भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांच्या गाडीला अपघात झाला. उत्तर प्रदेशच्या उनामध्ये काल रात्री हा प्रकार घडला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उना सोडून अनुराग ठाकूर चंबाला जात होते. यावेळी त्यांच्या गाडीला अचानक गाय आडवी आली.

गायीला वाचवण्यासाठी ड्रायव्हरने गाडी रस्त्यावरुन खाली ओढली, मात्र गाडीने गायीला धडक दिलीच शिवाय गाडीचं मोठं नुकसान झालं. अनुराग ठाकूर मात्र सुरक्षित आहेत.