बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लस घेण्यासाठी काहीपण; ‘या’ अभिनेत्रींबद्दल धक्कादायक माहिती आली समोर

मुंबई | लसीचा तुटवडा भासत असल्यामुळे 45 वर्षापुढील नागरीकांना लस मिळत नाहीये. त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण पुढे ढकलण्यात आलं आहे. असं असतानाही काहीजण नकली आयडी बनवून लस घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या चौकशी समितीच्या अहवालात ठाणे महानगरपालिकेच्या चौकशी समितीच्या अहवालात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या चौकशी अहवालात तामिळ-तेलगू चित्रपटातील प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री मीरा चोप्रा हिने काही दिवसांपूर्वी नकली आयडी बनवून लस घेतली. तसेच मीरा प्रमाणेच या अहवालात सौम्या टंडनचं नाव समोर आलं आहे. सौम्यानेही आपलं नकली आयडी बनवून बेकायदेशीरपणे लस घेतल्याचा दावा केला जात आहे. आतापर्यंत 21 बनावर ओळखपत्र तयार करून 15 जणांचे बेकायदेशीर लसीकरण झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी सौम्याने ‘जब वी मेट’ या हिंदी चित्रपटात चित्रपटात ‘रूप’ ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘कॉमेडी एक्सप्रेस’, ‘डान्स इंडिया डान्स’ या रियालिटी शोच सूत्रसंचालन करताना दिसली. त्यानंतर सौम्याला ‘भाभी जी घर पे है’ या मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारण्यास मिळाली. सौम्याने या व्यक्तिरेखेमुळे खूप लोकांच्या मनात एक स्थान निर्माण केलं आहे. परंतू तिने या मालिकेला अलविदा केलं असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, सौम्या आणि सौरभ सिंग हे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी 2016 ला विवाह केला. त्यानंतर सौम्याने 2019 मध्ये एका गोंडस मुलाल जन्म दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं- खासदार संभाजीराजे

“टॅापर्स नेहमीच अव्वल राहतात”; मोदींच्या प्रश्नाला विद्यार्थ्यांचं भन्नाट उत्तर

सरकारवर टीका केली म्हणून राजद्रोहाचा खटला भरता येणार नाही; विनोद दुआंवरील गुन्हा रद्दबातल

प्रियकराचं लग्न ठरलं, ढोल-ताशा घेऊन दारात आलेल्या प्रेयसीनं केला भलताच ड्रामा

75 वर्षीय सासऱ्याला कोरोनाची लागण, सुनेनं पाठीवर उचलून दवाखान्यात नेलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More