बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधानांचं सोडा, अर्थमंत्र्यांनाही अर्थशास्त्र कळत नाही, दोघंही घमेंडी”

मथुरा | केंद्र सरकारवर (Central Government) विरोधी पक्षांकडून सातत्याने महागाई (Inflation), बेरोजगारी (Unemployment) यावरून टीका होत आहे. काँग्रेस (Congress) पक्षाकडून जयपूर येथे महागाई हटाव रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. ही रॅली महागाई आणि बेरोजगारीबाबत आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. त्यातच आता भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी (BJP MP Subramaniam Swamy) यांनी महागाई आणि देशाच्या विकासदरावरून भाजपला घराचा आहेर दिला आहे.

यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी माध्यमांशी संवाद साधताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे की, महागाई वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे अर्थशास्त्राविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही माहिती आहे ना अर्थमंत्री निर्मला सीतारामण, हे दोघेही घमंडी आहेत, अशी घणाघाती टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

तसेच या दोघांना असे वाटते की, आपल्याला सर्व काही माहिती आहे. परंतु, प्रत्यक्षात यांना काहीचं माहिती नाही. त्यातच महागाईचा दर सातत्याने वाढत आहे. सरकार याबाबत कोणाचाही सल्ला घेत नाही. विकास दर खाली येत असला तरी काय करायचे हे कळत नाही, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. तसेच काही हिंदूत्व संघटनांनी मथुरा आणि काशीमधील धार्मिक स्थळे परत करण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांनी भारत आणि चीन सीमावादाच्या मुद्यावर समाधानी नसल्याचं म्हटलं आहे. 15 ऑगस्ट 1947 पुर्वी अस्तित्वात असलेल्या कुठल्याही धर्माच्या प्रार्थनास्थळांचे अन्य प्रार्थनास्थळात रूपांतर होणार नाही, असे प्रार्थना स्थळे कायदा 1991 मध्ये म्हटलं आहे. विरोधी पक्ष टीका करत असताना पक्षातील  नेत्यानेच केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

थोडक्यात बातम्या- 

“केंद्र सरकार न्यायालयाला खोटं बोलतंय की संसदेला?”

न्यायालयाच्या निकालानंतर छगन भुजबळ आक्रमक, दिला ‘हा’ गंभीर इशारा

“निवडणुका होणारच, ते ही ओबीसी आरक्षणाशिवाय”, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

“चंद्रकांत पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी”

“हा सगळा प्री प्लॅन होता, त्यांच्या जाण्यानं मनसेला…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More