#आपलीमेट्रोहिंदीनको चळवळ जोरात, सोशल मीडियावर संताप

मुंबई | सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठीजनांनी मुंबई मेट्रोत वापरल्या जाणाऱ्या हिंदीविरोधात तीव्र मोहीम हाती घेतलीय. #आपलीमेट्रोहिंदीनको असं या मोहिमेला नाव देण्यात आलंय. 

खरंतर मेट्रोत इंग्रजीनंतर मराठीचा वापर व्हायला हवा, मात्र राष्ट्रभाषेच्या नावाखाली हिंदी आपल्यावर थोपवली जातेय. त्याविरोधात ही मोहीम राबवण्यात येतेय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठी बोला चळवळीच्या तक्रारीवरुन राज्य सरकारने मेट्रोला यासंदर्भात विचारणा करणारं पत्र धाडलं होतं. मात्र मेट्रोत अद्याप मराठीला स्थानचं दिलंच गेलेलं नाही.