बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोल्हे देशाची माफी मागा, अन्यथा…” तीन तरुणांनी जाहीर केली भूमिका

मुंबई | राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेवर (Nathuram Godse) राष्ट्रवादीचे खासदार आणि कलाकार अमोल कोल्हे यांचा चित्रपट येणार आहे. अमोल कोल्हे ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुरामाची भूमिका साकारणार आहेत. अशातच नथुरामांच्या भूमिकेवरून त्यांचा कडाडून विरोध होताना दिसत आहे.

अमोल कोल्हे यांनी नथुरामाच्या भूमिकेवर आपलं स्पष्टीकरण दिलं होतं. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील अमोल कोल्हे यांची पाठराखण केली होती. अशातच आता तीन तरूणांनी अमोल कोल्हे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

अमोल कोल्हे यांनी देशाची माफी मागावी, अन्यथा 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी कोल्हे यांच्या नारायणगाव येथील अमोल कोल्हे यांचे निवासस्थानाबाहेर बसून महात्मा गांधी की जय अशा घोषणा देऊ, असं तरूणांनी म्हटलं आहे. हर्षल लोहकरे, संजय झिंजाड, शंभुसिंह चव्हाण, असं या तीन तरूणांचं नाव आहे.

दरम्यान, आजारी कोल्हे यांना स्वास्थ्य सुधारण्यासाठी गुलाबाची फुलं देणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. या सविनय गांधीवादी आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून आवाहन देखील केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

Gold Price: सोनं-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी महाग, वाचा आजचे ताजे दर

‘…तोपर्यंत शाळा सुरु करण्यास मोठा धोका’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

मराठमोळा पुष्पा! अल्लू अर्जुनच्या मराठी ट्रेलरचा सोशल मीडियावर बोलबाला, पाहा व्हिडीओ

Instagramद्वारे आता कमवा बक्कळ पैसा, कंपनीनं केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा

हाॅलिवूडला मोठा धक्का! Marvelच्या सिरिजमधील अभिनेत्याचा अपघाती मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More