बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् आराध्या बच्चनने अभिषेकऐवजी रणबीरला कपूरला बाबा म्हणून मारली मिठी

मुंबई | बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन सर्वांना माहित आहेत. विश्वसुंदरी ऐश्वर्या बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी असलेल्या आराध्याने एकदा चॉकलेट हिरो रणबीर कपूरला बाबा म्हणून मिठी मारली होती. याबाबत ऐश्वर्याने ‘फिल्मफेअर’ या मासिकेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

आराध्याने एकदा अभिषेक समजून रणबीरला मिठी मारली होती. त्यावेळी रणबीरही आश्चर्यचकित झाला होता. परंतू आराध्याचा हा गोंधळ कशामुळे झाला होता हे माझ्या लक्षात आलं. त्यावेळी रणबीरने अभिषेकसारखी टोपी आणि सूट परिधान केला होता. मी आराध्याला याबाबत विचारलं असता तिनेसुद्धा मला हेच उत्तर दिलं असल्याचं ऐश्वर्याने सांगितलं.

हा किस्सा घडल्यापासून आराध्या रणबीर दिसला की लाजतेच. रणबीरचे वडील ऋषी कपूर माझे वडील होते आणि आता आराध्या रणबीरला अशी लाजू वावरते. हे एक वर्तुळ पुर्ण झाल्याचं ऐश्वर्या म्हणाली. 2016 साली रणबीर आणि ऐश्वर्या एकत्र ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात दिसले होते.

दरम्यान, मी आराध्याला रणबीरची ओळख करून देताना रणबीर अंकल अशी दिली होती. त्यावेळी रणबीरने तिला आरके बोल असं सांगितलं. त्यानंतर तिने दोन दिवस रणबीर अंकल म्हणून हाक मारली आणि दुसऱ्या दिवशी तिने थेट आरके म्हणून हाक मारली होती. तेव्हा आम्ही खूप हसलो असल्याचं ऐश्वर्याने सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

कौतुकास्पद! मराठमोळ्या अभिनेत्रीची पुरग्रस्तांना तब्बल 10 कोटींची मदत

पुणे हादरलं! दत्ता फुगेंच्या मुलाच्या कानशिलात लगावल्याचा राग, तरुणाची हत्या

…म्हणून मी रुग्णालयात दाखल झालो होतो; जयंत पाटलांचं स्पष्टीकरण

पुढच्या निवडणुकीत मोदी विरूद्ध भारत असेल- ममता बॅनर्जी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More