मुंबई | मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या टर्ममधला देशाचा अर्थसंकल्प काल लोकसभेत सादर केला. अर्थसंकल्पात मुलींच्या लग्नाचं वय बदलणार असल्याचं संकेत दिले. यावर सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने यावर भाष्य केलं आहे.
जेव्हा मुलगी मनाने मोठी होती आणि लग्नासाठी ती प्रॉपर मनाने तयार असते तेव्हा तिने लग्न करावं, असं परिपक्व आणि सर्वांना विचार करायला लावणारं उत्तर रिंकूने दिलं आहे.
मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 करणं हा चांगला प्रस्ताव आहे. याने निश्चितच मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढायला मदत होईल, असंही मत रिंकूने मांडलं आहे. यावेळी बोलताना मुंबईच्या नाईट लाईफवरही रिंकू बोलली.
दरम्यान, मला नाईट लाईफ म्हणजे काय हे माहिती नाही. मी फक्त एवढचं ऐकलंय की मुंबई कधीच झोपत नाही. ती 24 तास जागीच असते, असं रिंकू म्हणाली.
ट्रेंडिंग बातम्या-
“शून्याचा शोध आर्यभट्टने लावला अन् लोकांच्या हाती शून्य देण्याचा इतिहास भाजपच्या नावावर”
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा अखेरचा तोडगा नाही- शरद पवार
महत्वाच्या बातम्या-
मोदी सरकारने मांडलेल्या बजेटवर पी. चिदंबरम यांची सडकून टीका
CAAला पाठिंबा पण NRC राज्यात लागू होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे
लोणीकरांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, ‘ते’ वक्तव्य आक्षेपार्हच- चित्रा वाघ
Comments are closed.