बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुमचे लोक धुतल्या तांदळासारखे आहेत का?, रोज गंगेत स्नान करुन पाप करतात”

मुंबई | महिन्याभरात महानगरपालिका निवडणुका आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. आज सकाळी आयकर विभागानं मुंबई महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला. याप्रकरणी आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तुमचे लोक धुतल्या तांदळासारखे आहेत का? तुमचे लोक रोज गंगेत स्नान करतात आणि पाप करतात. त्याच्यामुळे गंगा जास्त खराब झाली आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.

आपल्या विचारांचं सरकार आलं नाही म्हणून त्या पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या आधारे चिरडून टाकायचं, बदनाम करायचं सुरु आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, मुंबई मनपातील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात खळबळ उडालेली पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

युक्रेनमधील सायकलस्वारावर पडला रशियाचा बॉम्ब, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर

मोठी बातमी! नवाब मलिकांनंतर शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर केंद्रीय तपास यंत्रणेची कारवाई

‘ज्यांना पक्ष सोडून जायचंय त्यांनी खुशाल जा पण नंतर…’, राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना तंबी

Russia-Ukraine War | युक्रेनियन सैनिकाचा ‘तो’ भावूक व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

रशियाच्या आक्रमणाला तोंड देणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष स्वत: रणांगणात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More