मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे अभिनेता अर्जुन कपूरला जबर धक्का बसला आहे. अर्जुन आणि सुशांतमध्ये खूप चांगली मैत्री होती.
अर्जुनने सुशांतसोबत केलेल्या खासगी चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. अर्जुनने सुशांतच्या आत्महत्येनंतर एक भावूक पोस्ट लिहिली आहे.
तुझ्या आत्महत्येमुळे आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. तू हे टोकाचं पाऊल का उचलंस हा प्रश्न आम्हाला त्रास देतोय. तुझ्या नावाने सुरु असलेला हा तमाशा लवकरच संपेल. वातावरण शांत होईल. त्यानंतर सर्वांना कळेल हा निर्णय तू कुठल्या एका घटनेमुळे घेतला नव्हतास, तर यामागे कदाचित अनेक कारणं होती, असं अर्जुन म्हणाला आहे.
अर्जुनने जवळपास 18 महिन्यांपूर्वी सुशांतसोबत केलेल्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. सुशांतशी चर्चा करत असताना त्याला आपल्या आईची आठवण येत होती, असं अर्जुन म्हणालाय.
ट्रेंडिंग बातम्या-
उषा नाडकर्णी ढसढसा रडल्या, सुशांतच्या आठवणीने व्याकूळ!
सर्दी-खोकल्याच्या आधी दिसू शकतात
महत्वाच्या बातम्या-
फायनल टेस्टिंगमध्ये पोहोचलं कोरोनाचं ‘हे’ औषध, जुलैमध्ये मिळू शकते गुडन्यूज!
मुंबईत आढळली कोरोनाची नवी लक्षणं; ‘ही’ लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा!
सुशांतच्या आत्महत्येला नवं वळण?; सुशांतच्या ‘या’ मैत्रिणीचा पोलीस जबाब घेणार
Comments are closed.