जालना | एमआयएमचे नेते आणि भायखळ्याचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यातच शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी वारिस पठाणांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
फालतू लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. वारिस पठाण हे लावारिस पठाण आहेत. कारण लावारिस लोकच असं वक्तव्य करु शकतात. वारिस पठाण यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, अशी कडवट टीका खोतकर यांनी केली आहे.
वारिस पठाण माझ्यासमोर आले तर त्यांच्या कानशीलात लगावेन. त्यांना त्यांची औकात दाखवण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करुन धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वारिस पठाणांना त्यांची जागा दाखवून देऊ, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, आम्ही 15 कोटी आहोत, मात्र 100 कोटींवर भारी आहोत हे लक्षात ठेवा, असं समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं होतं.
ट्रेंडिंग बातम्या-
“फडणवीस दिल्लीत जाऊन चांगलं काम करतील, त्यांना माझ्या शुभेच्छा”
‘उद्धव ठाकरेंनी आधी CAA कायदा समजून घ्यावा’; काँग्रेस नेत्याचा सल्ला
महत्वाच्या बातम्या-
वारिस पठाणांचं शीर कलम करणाऱ्याला 11 लाखांचं बक्षिस; मुस्लीम संघटनेची घोषणा
राज्य 60व्या वर्षात पदार्पण करतंय अन् मी 80 व्या, या वयात आपण थांबायचं…- शरद पवार
वाघ आहे का बेडूक; मनसेची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
Comments are closed.