बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सचिन तेंडुलकरला मोठा धक्का, मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबईकडून डच्चू!

मुंबई | भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्यामुळे नुकताच वादात सापडला होता. आता याच सचिन तेंडुलकरसाठी वाईट बातमी आहे. मुलाच्या करिअरसाठी चिंतातूर असलेल्या सचिनला या बातमीनं मोठा धक्का बसला आहे, मुंबईच्या संघातून त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला डच्चू देण्यात आला आहे.

सचिन तेंडुलकर जरी फलंदाज असला तरी त्याचा मुलगा जलद गोलंदाजीसाठी ओळखला जातो. कधीकधी कामचलावू फलंदाजीही तो करु शकतो, मात्र नुकत्याच मुंबईत झालेल्या विजय हजारे ट्राॅफीच्या सराव सामन्यात अर्जुन तेंडुलकरची कामगिरी फारच खराब झाली, त्यामुळे त्याला विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

अर्जुनने याच वर्षी मुश्ताक अली स्पर्धा खेळली होती. यामध्ये तो पदुच्चेरी आणि हरियाणा या संघांविरुद्ध खेळला होता. याच स्पर्धेत खेळल्यामुळे अर्जुन आयपीएलच्या लिलावासाठी पात्र ठरला होता आणि लवकरच होणाऱ्या आयपीएलच्या मिनी लिलावात त्याच्यावर बोली देखील लागणार आहे.

प्रत्येक पालकाला आपल्या मुलांच्या करिअरची चिंता असते तशी ती सचिनला देखील आहे. एका यशस्वी क्रिकेटपटूचा मुलगा असल्यानं अर्जुनला तेवढं चांगलं मार्गदर्शनही लाभलेलं आहे, तसेच त्याला यासंदर्भात दडपणही सहन करावं लागत असेल. मात्र तो या क्षेत्रात कितपत यशस्वी ठरतो यावर शंका आहे.

लवकरच होणाऱ्या आयपीएलच्या लिलावासाठी अर्जुन तेंडुलकरची बेस प्राईजही ठरवण्यात आली आहे. २० लाख रुपये इतकी त्याची बेस प्राईज असणार आहे. काही संघ अर्जुनवर बोली लावू शकतात, अशी शक्यता आहे. यामध्ये अंबानींच्या मुंबई इंडियन्सचं नाव सर्वात आघाडीवर आहे.

अर्जुन तेंडुलकरवर कोणता संघ बोली लावतो याकडे संपूर्ण क्रिकेट वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. जर त्याच्यावर कुणीही बोली लावली नाही तर कोणताही संघ त्याला त्याच्या बेस प्राईजवर आपल्या संघात सहभागी करुन घेऊ शकतो.

दुसरीकडे सचिन तेंडुलकर तसेच अर्जुन तेंडुलकर यांच्यासाठी जरी ही गुडन्यूज असली तरी ही न्यूज मिळाल्यानंतर दोनच दिवसात मुंबई संघानं त्याच्यावर अविश्वास दाखवला आहे. विजय हजारे स्पर्धेच्या सराव सामन्यात अर्जुनला ४.१ षटकात एकही बळी घेता आलेला नाही, याउलट त्याने ५३ धावा दिल्या होत्या, त्यामुळे त्याला विजय हजारे स्पर्धेसाठी मुंबई संघातून वगळण्यात आलं आहे.

मुंबई संघानं अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघातून वगळल्यानं तो आता फ्री असेल, लवकर होणाऱ्या आयपीएलच्या लिलावात त्याच्यावर कोण बोली लावतं ते समजेलच तसेच त्याच्या सुमार कामगिरीमुळे कुणी त्याला संघात घेतं की नाही हेही कळेल, मात्र असं असलं तरी आयपीएलसाठी सराव करण्यास आता अर्जुनला वेळ भेटणार असल्याचं बोललं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यातील स्नेहल काळभोर अवघ्या 21 व्या वर्षी झाली सरपंच!

गोल्डनमॅन असणं ठरतंय शाप; ‘या’ चार गोल्डनमॅनला मृत्यूनं अकाली गाठलं!

तरुणीचा लग्नाला नकार, ‘प्रपोझ डे’ दिवशी तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल

आम्ही कुणाला घाबरत नाही, जे बोलायचं ते छातीठोकपणे बोलतो- चंद्रकांत पाटील

“नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More