Top News

अर्णब गोस्वामींना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा नाहीच!

मुंबई | अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना हायकोर्टाने तूर्तास दिलासा देण्यास नकार दिला आहे.

हायकोर्टाने आजच्या आज जामीन देण्यास नकार दिल्याने, अर्णब गोस्वामी यांना आजची रात्र अलिबागच्या शाळेत काढावी लागणार आहे. अर्णब यांच्या जामिनावर शुक्रवारी दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली आहे.

दरम्यान, आजच्या सुनावणीदरम्यान देशातील ख्यातनाम वकील हरीश साळवे यांनी कोर्टात अर्णब गोस्वामी यांची बाजू मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या- देवेंद्र फडणवीस

इतक्या प्रतिष्ठित व्यक्तीला अशा प्रकारे अटक करणं चुकीचं आहे- मुकेश खन्ना

अर्णबला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का?, हरिश साळवेंच्या प्रश्नावर कोर्ट म्हणालं…

गोव्यात आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेला अटक!

“300 कोटींचा मालक 5 ते 6 कोटींसाठी आईबरोबर आत्महत्या करतो, हे मला पटत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या