बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अर्णब गोस्वामींना दिलासा नाही; आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार!

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आजही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जवरील सुनावणी उद्या दुपारी पार पडणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. आज युक्तीवाद झाल्यानंतर उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी उद्या दुपारी 12 वाजता घेणार असल्याचं सांगितलं.

अर्णब गोस्वामी यांना रात्री अलिबाग दंडाधिकारी कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी पोलिसांनी आधीच आपला ‘ए’ समरी रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा आरोपीच्या कस्टडीची गरज नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार असून उद्या जामीन मिळणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘आदित्य ठाकरे आपण लपूनछपून उत्तर देण्यापेक्षा थेट चर्चेला या’; शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान

राज्यघटनेनुसार कृषीविषयक कायदे करण्याचा अधिकार केंद्राला नाही- पृथ्वीराज चव्हा

महाराष्ट्र सरकारला मोठा झटका; अर्णब गोस्वामींबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिले ‘हे’ आदेश

“फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला, कागदोपत्री सिद्ध करुन दाखवणार”

दम असेल तर… मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं योगी आदित्यनाथांना ओपन चॅलेंज!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More