Top News

अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी!

मुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली होती. दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्या तातडीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी निर्णय देण्यात येणार आहे.

अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळणार की नाही याचा निर्णय आता उद्या निर्णय घेण्यात येणारे. उद्या उच्च न्यायालयात अर्णब गोस्वामी यांना जामीन अर्ज नाही मिळाला तर त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे.

दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

आरोपींच्या वकीलांकडून हायकोर्टात काही विषयांवर सुनावणी चालू असल्याचे पेपरवर्क सादर करण्यात आले. त्यानुसार पोलीस कोठडीवरील सुनावणी स्थगित करण्यात यावी अशी मागणी आरोपीच्या वकीलांकडून कोर्टाकडे करण्यात आली. त्यावर निर्णय देत कोर्टाने आजची सुनावणी स्थगित करत येत्या 9 नोव्हेंबरला पुढील सुनावणीची तारीख दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी; अण्णा हजारेंची टीका

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

जलसंधारण मंत्र्यांच्या भावजयीचा मृतदेह आढळला; नगर जिल्ह्यात खळबळ!

जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोना संसर्ग रोखण्यात यश- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या