खेळ

वेस्ट इंडिजमध्ये खेळत असलेल्या मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट!

Loading...

कोलकाता | भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात पश्चिम बंगालमधील कोर्टाने अटक वॉरंट जारी केलाय. कौटुंबीक हिंसाचार प्रकरणी शमी आणि त्याच्या भावावर आयपीसी 498A कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वारंवार सांगूनही तो हजर न राहिल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आला. शमीला या वॉरंटविरोधात जामीन मागण्यासाठी किंवा हजर होण्यासाठी 15 दिवसांचा कालावधीही कोर्टाकडून देण्यात आला आहे.

Loading...

शमीची पत्नी हसीन जहाँने कौटुंबीक छळाचा आरोप केल्यानंतर शमी आणि त्याच्या भावावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. शमीवर त्याच्या पत्नीने मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता, ज्यात त्याला बीसीसीआयकडून क्लीनचिट देण्यात आली.

दरम्यान, शमी सध्या भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. आरोपपत्र पाहिल्यानंतरच शमीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलंय.

Loading...

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या