औरंगाबाद महाराष्ट्र

बीडच्या अपर जिल्ह्याधिकाऱ्याला 5 लाख रुपयांची लाच घेताना अटक

बीड | बीड जिल्ह्याचे अपर जिल्ह्याधिकारी बी.एम.कांबळे यांच्यासह अव्वल कारकून महादेव माहकूडे यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना शनिवारी पकडण्यात आले. 

स्वस्त धान्यांच्या अनियमिततेप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमध्ये तक्रारदाराच्या बाजूने अहवाल देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आले.

कांबळे यांच्या शासकीय निवासस्थानीच ही कारवाई करत त्यांच्या घराची लाचलूचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी झडती घेतली असून दोघांनाही तिथूनच अटक करण्यात आली.

दरम्यान, एक वर्षापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी डाॅ. नरहरी शेळके आणि प्रतिनियुक्तीवरील लेखा पर्यवेक्षक बब्रुवान फड यांना 1 लाख 15 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते.  

महत्वाच्या बातम्या-

-प्रियांका गांधींवर अश्लिल भाषेत टीका करणाऱ्या मोदी समर्थकांवर गुन्हे दाखल होणार

भाजपच्या काही खासदारांचे तिकीट कापणार?

-सांगलीमधून काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण लोकसभेच्या रिंगणात?

“पक्षात राहून गडबड करणाऱ्यांना चून चून के मारूंगा”

अखेर सलमान खान आणि कतरिना कैफचे होणार लग्न!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या