मुंबई | भाजपसोबत युती असताना शिवसेनेने औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. मात्र आता महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. अशातच भाजप नेते अतुल भातखळकरांनी एका कॅलेंडरचा फोटो पोस्ट करत शिवसेनेवर टीका करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर करणं झेपलं नाही, उस्मानाबादचे धाराशिव करणं जमलं नाही. परंतू ‘हिंदुहृदयसम्राट’चे ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे असं नामकरण मात्र यशस्वीपणे केलं असल्याची टीका अतुल भातखळकरांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
शिवशाही कॅलेंडर 2021 हे मराठी, इंग्रजी याचसोबत उर्दू भाषेत आहे. कॅलेंडरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुहृदयसम्राट ही पदवी हटवून त्याजागी जनाब बाळासाहेब ठाकरे असा नामोल्लेख करण्यात आला आहे. यावरूनही भातखळकरांनी सेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत.
दरम्यान, शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असं म्हणत भातखळकरांनी कॅलेंडरचा फोटो ट्विट केला आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर करणे झेपले नाही, उस्मानाबादचे धाराशिव करणे जमले नाही…
परंतु ‘हिंदुहृदयसम्राट’चे
‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे असे नामकरण मात्र यशस्वीपणे केले…कात टाकणाऱ्या शिवसेनेचे मनापासून अभिनंदन… @OfficeofUT
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 31, 2020
शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही…. @OfficeofUT pic.twitter.com/HPbspXSq5Y
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 31, 2020
थोडक्यात बातम्या-
तीन महिन्याचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला, तर पुढील पगार शेतकऱ्यांना- नवनीत राणा
“छत्रपतींचा महाराष्ट्र फक्त भाषणात नको कृतीत दाखवा, महिला सुरक्षा फक्त घोषणेपुरती”
बनावट कागदपत्र, आधार कार्ड, बनवत योगींच्या राज्यात पाकिस्तानी महिला झाली सरपंच
“गौरी तू ज्यामुळे हा निर्णय घेतला त्यांना नक्की शिक्षा मिळणार; कुणी रक्ताचं असलं तरी”
“काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस वाळवी सारखं पोखरतोय”