“राज ठाकरेंनी मोदी, शहांना घालवण्याची ‘सुपारी’ नाही तर ‘विडा’ घेतलाय”

मुंबई | राज ठाकरेंनी मोदी,शहांना घालवण्याची सुपारी नाही तर विडा घेतला आहे, असं काँग्रेसचे प्रवक्ते अरूण सावंत यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या सभांनी कुणाचा फायदा होत असेल तर त्यात काय चूक आहे. मोदी-शहा सारख्या घातक शक्तिला घालवण्यासाठी राज ठाकरेंनी विडा घेतला आहे, असं सावंत म्हणाले. ‘न्यूज18 लोकमत’च्या ‘बेधडक’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मनसेचे प्रवक्ते संदिप देशपांडे उपस्थित होते.

राज ठाकरेंच्या सभांचा परिणाम होत नसेल तर भाजपला घाम का फुटावा, असा सवाल संदिप देशपांडे यांनी भाजपला केला आहे.

दरम्यान, कालच्या सोलापुरच्या विराट सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज इचलकरंजीत जाहीर सभा घेत आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता सभेला सुरूवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-सुजयच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; साकळाई योजना पूर्ण करणारच!

-जालन्यात रावसाहेब दानवेंचा कस लागणार; औताडे मुसंडी मारण्याची शक्यता

-भाजपलाच मतदान करा, मोदींनी कॅमेरे लावले आहेत; भाजप आमदाराची धमकी

ज्यांना गरिबी हटवायला जमली नाही ते विकास काय करणार; बापटांचा काँग्रेसवर घणाघात