बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जर पाकिस्तानने हल्ला केला तर राज्यांवर जबाबादारी सोडणार की उत्तर प्रदेश स्वत:चे रणगाडे खरेदी करणार?”

नवी  दिल्ली | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी केंद्र सरकारने 18 वर्षावरील लसीकरण करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या. मात्र अपुऱ्या डोसमुळे लसीकरणाची मोहीम अत्यंत मंद गतीने चालत आहे. राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. याच पार्श्वभूूमीवर राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यांना जगभरातील कंपन्या कोरोना लस पुरवण्यास तयार नाहीत. केंद्राने हात वर केले आहेत. केंद्र सरकार लस का खरेदी करत नाही?, लसींची खरेदी आपण राज्यांवर सोडू शकत नाही. आपला देश कोरोनाविरोधात युद्ध लढत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

जर पाकिस्तानने आपल्या देशावर हल्ला केला तर तुम्ही राज्यांवर याची जबाबदारी सोडणार आहात का?, असा खोचक सवाल केजरीवालांनी केंद्र सरकारला केला आहे. त्यासोबतच उत्तर प्रदेश स्वत:चे रणगाडे खरेदी करणार आहे का की दिल्ली स्वत:ची हत्यारे खरेदी करणार आहे?, असंंही अरविंद केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, कोणतेही राज्य लसीचा एक डोसदेखील खरेदी करू शकलेलं नाही. लसी बनवणाऱ्या कंपन्यांनी राज्यांसोबत बोलण्यासही नकार दिला आहे. ही वेळ केंद्र आणि राज्य सराकरांनी एकत्र येऊन लढण्याची आहे. वेगवेगळे काम करू शकत नाही. लोकांना लस पुरवणं ही केंद्राची जबाबदारी आहे, राज्यांची नाही. जर आणखी उशिर झाला तर माहित नाही आणखी किती जीव गमवावे लागतील, असा इशाराही केजरीवालांनी दिला.

 

थोडक्यात बातम्या- 

चक्क मांजरानं केली ‘या’ प्राण्याची शिकार, पाहा व्हायरल व्हिडीओ

कडक ना भावा! दुचाकीनं चालणारी ही रूग्णवाहिका पाहिलीत का?, पाहा व्हिडीओ

शुल्लक कारणाने सासरच्यांकडुन छळ; पुण्यात राहत्या घरी गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

कोरोना लस घेतल्यानंतर 2 वर्षातच होणार मृत्यू?; जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागचं सत्य

‘नारायण राणेंना कावीळ झाली, पनवती म्हणून भाजपने त्यांना…’; राणेंच्या टीकेला शिवसेनेचं चोख प्रत्युत्तर

‘मैनू काला चष्मा जचता है’ म्हणत नवरीची लग्न मंडपात धमाकेदार एन्ट्री, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More