Top News देश

दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री केजरीवालांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली | राजधानीमध्ये केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरवील यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

खराब नेटवर्कमुळे शेतकऱ्यांना इंटरनेट वापरण्यामध्ये आणि कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलिंग करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांनी सांगितलं.

सिंघू सीमेवर शेतकऱ्यांसाठी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करणार असल्याची माहिती समजत आहे. आंदोलनकर्त्यांकडून ज्या ज्या ठिकाणी वाय-फायची मागणी होईल तिथे हॉट स्पॉट लावले जाणार असल्याचं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केरळमधील अननस सिटी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एर्नाकुलम जिल्ह्यातील वाझाकुलम येथून  16 टन अननसाचे ट्रक पाठवण्यात आले आहेत. केरळचे दिल्लीतील खासदार हे अननस वाटणार असल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो….’; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

‘मी ड्रग्जच्या आहारी गेले होते’; डीअर एनसीबी, कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार?

‘शिवसेना-राष्ट्रवादी मिळून आपल्याविरुद्ध रणनीती आखताहेत’; काँग्रेस नेत्याचं सोनिया गांधींना पत्र

पुण्यात आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं; रानगव्यांनंतर दिसला हरणांचा कळप!

‘पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर…’; संजय राऊत आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या