बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींनी लोकशाहीची थट्टा चालवलीय- अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाही आणि संघराज्य पद्धतीची थट्टा चालवलीय, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

मोदींनी काही वर्षांपूर्वी दिल्ली सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागावर निमलष्करी दलाच्या सहाय्यानं ताबा घेतला होता, असं त्यांनी म्हटलं आहे. 

नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडी आता लोकशाही आणि देशासाठी धोकादायक बनली आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. सीबीआयनं पश्चिम बंगालच्या पोलीस आयुक्तांच्या घरावर धाड टाकल्याप्रकरणी त्यांनी मोदींवर टीका केली आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्याशी बोलण झालं असून त्यांना आमचा पाठिंबा असल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मोदींच्या प्रेमापोटी केलं होतं लग्न; आता मात्र तिचं-त्याचं जमेना!

अण्णांमुळेच नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल सत्तेवर – राज ठाकरे

अण्णा आपण बाहेर पडू आणि या सरकारला गाडून टाकू- राज ठाकरे

मावळ लोकसभा लढवणार का?? पार्थ पवार म्हणतात…

“माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More