“येत्या काही दिवसांत अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील”
नवी दिल्ली | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती यायला सुरूवात झाली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि काँग्रेसला (Congress) जोरदार धक्का देत आम आदमी पार्टी (AAP) आघाडीवर आहे. पंजाबमधून सुरूवातीचे कल आपच्या बाजूने लागले असताना आपचे नेते राघव चड्ढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आप आता राष्ट्रीय शक्ती आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) पंतप्रधान होतील. आप आता देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेईल, असं वक्तव्य राघव चड्ढा यांनी केलं आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासातील एक मोठा दिवस आहे. आगामी काळात आप काँग्रेसची जागा घेईल, अशी प्रतिक्रिया चड्ढा यांनी दिली.
हे नेते जनतेच्या खिशातून आपले महाल सजवत आहेत. आज त्यांच्या महालात बसवलेली प्रत्येक वीट सर्वसामान्यांच्या रक्ताची आणि घामाची वीट आहे, असंही राघव चड्ढा म्हणाले आहेत. तर निवडणुकीत पंजाबच्या जनतेने आम्हाला भेट दिल्याचंही चड्ढा म्हणाले आहेत.
दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेसने पराभव स्विकारला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी राज्यपालांकडे राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबमध्ये आपने सुरूवातीलाच मुसांडी मारत काँग्रेसला मागे टाकलं होतं. (Punjab Assembly Election 2022)
थोडक्यात बातम्या-
सर्वात मोठी बातमी! पणजी मतदार संघातून उत्पल पर्रीकर यांचा पराभव
महाराष्ट्राच्या बाहेर शिवेसनेच्या ‘फ्लाॅप शो’वर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवलाय”
Goa Election Result 2022: मनोहर पर्रीकरांच्या मुलाचा भाजपला जोर का झटका
Up Election Result 2022: पहिल्या दीड तासात शिवसेनेचा फ्लाॅप शो
Comments are closed.