बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आप’च्या कार्यालयात केजरीवाल कुटुंबाचं दुहेरी सेलिब्रेशन

नवी दिल्ली | दिल्लीच्या मिसेस मुख्यमंत्री सुनिता केजरीवाल यांच्या वाढदिवशीच दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. नवी दिल्ली मतदारसंघातून पुन्हा विजयी होत केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक केली आहे. यामुळे केजरीवाल कुटुंबं दुहेरी सेलिब्रेशन करत आहे.

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या कार्यालयातच सुनिता केजरीवालांचा बर्थडे आणि पक्षाच्या विजयाचं दुहेरी सेलिब्रेशन करण्यात आलं. अरविंद केजरीवालांनी पत्नीला केक भरवतानाचा फोटो देखील व्हायरल झाला आहे.

आपकडून सत्ते खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे. आप 62 तर भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान, दिल्लीकरांनी त्यांच्या मुलावर विश्वास ठेवला, त्याबद्दल आभार. हा केवळ दिल्लीचा नाही तर संपूर्ण देशाचा विजय आहे. दिल्लीच्या जनतेनं आज एका नव्या राजकारणाला जन्म दिलाय, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही- शरद पवार

दिल्लीकरांनी भाजपच्या भ्रमाचा भोपळा फोडला- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या- 

भाजपला आता कोणतीही ‘बाग’ आठवणार नाही- अखिलेश यादव

दिल्लीवालो…आय लव्ह यू- अरविंद केजरीवाल

ग्लॅमरस अंदाजातल्या सई, ललित, पर्णचा ‘मीडियम स्पाइसी’ झळकणार 5 जूनला !

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More