बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Aryan Khan Case: आर्यन खान प्रकरणाचा तपास स्थगित; ‘हे’ कारण आलं समोर

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर (Aryan Khan Case) बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात देखील चांगलीच खळबळ उडाली होती. आर्यन खान प्रकरणातील अनेक खुलास्यांमुळे प्रकरणाला रोज वेगळं वळण लागलेलं पाहायला मिळत होतं.

आर्यन खानच्या अटकेनंतर कथित खंडणी प्रकरण समोर आलं होतं. या कथित खंडणी प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना या प्रकरणाचा तपास स्थगित (Postponed) करण्यात आला आहे.

‘कॉर्डेलिया क्रुझवरील (Cordelia Cruise) ड्रग्ज संदर्भातील कथित खंडणी प्रकरणाचा तपास थांबवण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणताही पुरावा न मिळाल्याने पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे’, अशी माहिती मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणात मुंबई पोलीसांच्या विशेष चौकशी पथकाने (SIT) सुमारे 20 जणांची चौकशी केली. या प्रकरणात कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने पोलीसांनी या प्रकरणाचा तपास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

Omicronबाबत केलेल्या अभ्यासातून ‘ही’ दिलासादायक माहिती समोर, तज्ज्ञ म्हणाले…

‘सात समंदर पार’ गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

एसटी संप: कर्मचारी आज कामावर रुजू न झाल्यास होणार ‘ही’ मोठी कारवाई

धक्कादायक! पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी KYC कशी करायची? वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More