बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहरूखच्या लेकाच्या अडचणीत वाढ???; आर्यन खानला होऊ शकते 10 वर्षाची शिक्षा!

मुंबई | बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला सध्या ड्रग्जचं सेवन, विक्री आणि ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी आर्यन खानसोबत 12 जणांना ताब्यात घेतलं आहे. आर्यननं फक्त भारतातच नाही तर इतर देशांमध्येही ड्रग्जचं सेवन केल्याची माहिती समोर येत आहे. आर्यन खानला अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आर्यन खानवर गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते.

आर्यन खानसह इतर जणांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलम 20 बी 8 सी, 27 आणि 35 कलम लावण्यात आले आहेत. जो कोणी व्यक्ती मादक पदार्थाची आंतरराज्यीय आयात-निर्यात करतो. त्या व्यक्तीला 10 वर्षाची शिक्षा आणि  1 लाख रूपयांचा दंठ ठोठवला जाऊ शकतो. त्यामुळे आर्यन खानवर जर हा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला 10 वर्षाची शिक्षा होऊ शकते.

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी आर्यन खान, अरबाज मर्चेंट, आणि मुनमुन धमेचा यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आतापर्यंत आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ सापडले नाहीत, मात्र अरबाज मर्चेंट याच्या बुटामध्ये चरस लपवल्याचं निदर्शनास आलं आहे.

दरम्यान, क्रुझवरील केलेल्या कारवाईत एनसीबीने 5 ग्रॅम एमडी, 13 ग्रॅंम कोकेन, एमडीएमच्या गोळ्या आणि 21 ग्रॅम चरस जप्त केला आहे. त्याचबरोबर तब्बल  1 लाख 33 हजार रूपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘जर पोलिसांनी प्रियांका गांधींना सोडलं नाही तर…’; नाना पटोले आक्रमक

शिवलीला पाटीलने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; चाहत्यांना मोठा धक्का

‘हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके जायेंगे’; खडसेंचा भाजपला इशारा

भारतातील लसीकरणाविषयी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

‘तुम्ही गैरसमज पसरवू नका’; नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीवरून अजित पवारांनी फडणवीसांना सुनावलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More